आनंदी राहायला कुणाला आवडत नाही. पण प्रत्येक माणूस आनंदी राहतोच असं नाही.



कुणाला आर्थिक त्रास असतो, टेन्शन असतं तर कुणाला कौटुंबिक तणाव असतो तर कुणी आजारांनी त्रस्त असतो.



आनंदी राहता यावं यासाठी अनेकदा लोकं वेगवेगळे उपाय करतात. मात्र त्यानं ते आनंदी होतीलच असं नाही.



मानसिक दृष्टीनं आनंदी राहणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.



कोरोना महामारीमुळे कित्येक नागरिक त्रासलेले आहेत. अनेकांच्या चेहऱ्यावरील आनंद हरवला आहे.



नोकरीच्या ठिकाणी असलेला ताण अशा गोष्टी देखील मानसिक आरोग्यावर परिणाम करतात.



यासाठीच जागतिक आनंददायी दिवस साजरा केला जातो.