आशिया चषक 2022 च्या ट्रॉफीवर भारतीय महिलांनी नाव कोरलं आहे.



फायनलच्या सामन्यात भारतीय महिलांनी श्रीलंकेच्या महिलांना मात दिली आहे.



अंतिम सामन्यात 8 विकेट्सने भारतीय महिलांनी विजय मिळवला आहे.



उत्तम गोलंदाजी करत भारतानं आधी 65 धावांवर श्रीलंकेला रोखलं



त्यानंतर भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने नाबाद 51 धावा ठोकल्या. तिच्या अर्धशतकाच्या जोरावर 8 विकेट्स राखून भारताने विजय मिळवला.



यावेळी प्लेअर ऑफ द मॅच  म्हणून भारताच्या रेणुका सिंहला गौरवण्यात आलं.



तर या भव्य स्पर्धेची प्लेअर ऑफ द सिरीद  भारताची स्टार गोलंदाज दीप्ती शर्मा ठरली.  



भारतानं यंदा विजय मिळवत 7 व्यांदा ट्रॉफी जिंकली आहे.



आतापर्यंत 8 वेळा आशिया चषक झाला असून 7 वेळा भारतानं कप जिंकला असून एकदा बांग्लादेशने विजय मिळवला आहे.



एकंदरीत पाहता भारतीय महिलांचीच आशिया कप स्पर्धेत हवा असल्याचं दिसून आलं आहे.