भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याचा आज वाढदिवस तो सध्या संघासोबत ऑस्ट्रेलिया येथे असून तिथेच त्याने वाढदिवस साजरा केला. यावेळी पांड्याने केक कट केला. बीसीसीआयनं केट कट करतानाचे खास फोटो पोस्ट केले आहेत. हार्दिक सध्या कमाल फॉर्ममध्ये असून त्याचा वाढदिवसही जल्लोषात साजरा झाला आहे. आगामी टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. पांड्याही संघासोबत आहे. काही दिवसांपूर्वीच पांड्या सर्व संघासोबत ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला. यंदाच्या विश्वचषकात पांड्याकडून संपू्र्ण देशाला बऱ्याच आशा असणार आहेत. पांड्याने आतापर्यंत 73 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 54 विकेट घेतल्या आणि 989 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 148.5 इतका आहे.