भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा निवृत्तीच्या वाटेवर सानियाने स्वत: एक मोठी घोषणा करून चाहत्यांना दिला आहे धक्का एकीकडे शोएब मलिकसोबत घटस्फोटाच्या बातम्या समोर येत असताना सानियाचा आणखी एक मोठा निर्णय दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सानिया कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळू शकते. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना सानियाने दिली महत्त्वाची माहिती मैदानावर निवृत्ती घ्यायची असल्याने मागील काही काळापासून सानिया निवृत्तीच्या प्रतिक्षेत होती आता दुखापतीतून सावरुन ती सराव करत असून मैदानात पुन्हा उतरणार आहे. ज्यानंतर एका दमदार कारकिर्दीला अलविदा म्हणणार आहे. भारतासाठी अनेक पुरस्कार सानियाने मिळवले आहेत.