केंद्रीय गृहमंत्रालयाने 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या काळात इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. आता येत्या 17 आणि 18 जानेवारीला ही परिक्षा घेतली जाणार आहे.ही परीक्षा केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत घेतली जाणार आहे.



IB ACIO भरतीसाठी निवड प्रक्रियेत साधारणपणे दोन टप्पे असतात. परीक्षा एकूण 150 गुणांची असते आणि दोन भागात घेतली जाते - टिअर 1 आणि टिअर 2.



टिअर 1- 100 बहुपर्यायी प्रश्न 5 विभागात विभागले जातात, प्रत्येक विभागात 20 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो.या परिक्षेत चालू घडामोडी,सामान्य अध्ययन,बुद्धीमत्ता चाचणी,अंकगणित, इंग्रजी. टिअर 1 मध्ये 1/4 गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असते.



टिअर 2- हा पेपर 50 गुणांसाठी वर्णनात्मक स्वरुपाचा असतो. यामध्ये 30 गुणांसाठी निबंध लेखन आणि 20 गुणांसाठी इंग्रजी आकलन व अचूक लेखणाकरिता हा पेपर असतो.दोन्ही पेपरसाठी प्रत्येकी 1 तासांचा वेळ असतो.



लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणीसाठी बोलावले जाते. मुलाखत 100 मार्कांसाठी असते.



वेतन - पास झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी 7 व्या वेतनआयोगानुसार 44,900 ते 1,42,400 रुपयांपर्यंत असते.



या परिक्षेसाठी उमेदवाराची पात्रता - पदवीधर आणि
वयोमर्यादा -18 ते 27 वर्षे



यामध्ये IB तथा केंद्रीय गृहमंत्रालय बदल देखील करू शकते.



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.