जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठ भारतात खुलं झालं होतं.



ज्याला आपणं 'नालंदा विद्यापीठ' नावाने ओळखतो.



या विद्यापीठाची स्थापना इ.स. 450 मध्ये झाली होती.



प्राचीन भारतात नालंदा विद्यापीठ उच्च शिक्षणाचं महत्त्वपूर्ण आणि जगद्विख्यात केंद्र होते.



नालंदा विद्यापीठाची स्थापना 5 व्या शतकात गुप्त राजवटीतील 'कुमारगुप्त पहिला' याने केली होती.



सन 1193 मध्ये 'बख्तियार खिलजी' ने हल्ला करुन या विद्यापीठाला जमीनदोस्त केलं होतं. याचे काही अवशेष आजही आपणाला पहायला मिळतात.



असं म्हटलं जातं की हल्ल्याच्या वेळी इथे आग लावली गेली.



त्याकाळी नालंदा विद्यापीठातील ग्रंथालयात इतकी सारी पुस्तकं होती की काही आठवड्यापर्यंत आग विझू शकली नाही.



या हल्ल्यात इथे काम करणारे पुजारी आणि बौद्ध भिक्खूही मारले गेले होते.



प्राचीन नालंदा विद्यापीचा संपूर्ण परिसर एका मोठ्या भिंतीने वेढलेला होता ज्याला एकचं प्रवेशद्वार होते.



नालंदाला तक्षशिला विद्यापीठानंतर जगातील दुसरं सर्वात प्राचीन विद्यापीठ मानलं जातं.



हे नालंदा विद्यापीठ 800 वर्षांपर्यंत अस्तित्वात होते.



नालंदा विद्यापीठ स्थापत्य कलेतील एक उत्तम नमुना आहे.