नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून पतंग उडविण्याची परंपरा येवल्याच्या नागरिकांनी जपली आहे.

रविवारपासून येवला शहरात पतंगोत्सवाला सुरुवात झाली आहे.

सलग तीन दिवस येवला शहरातील आकाशात लाखो पतंग झेपावणार आहेत.

निरभ्र आकाशात वेगवेगळ्या पतंग उंचच उंच भरारी घेताना 'एबीपी माझा'चा पतंग देखील आकाशात उंच उडणार आहे.

येवल्यातील भावसार पतंग स्टॉलवर 'एबीपी माझा'चा पतंग सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

राजकीय नेते , राम मंदिर, विविध संदेश देणारे पतंग यासोबतच एबीपी माझाच्या पतंगाची सध्या येवल्यात जोरदार चर्चा होत आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात पतंग महोत्सवात सहभाग घेतला.

मंत्री छगन भुजबळ यांनी 'एबीपी माझा' चा पतंग हाती घेत येवलेकरांना मकर संक्रातीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

येवल्याचा मकरसंक्रांतीला सलग तीन दिवस पतंग उडविण्याचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक लागतो तर भारतात दुसरा क्रमांक लागतो.

मकरसंक्रांतीनिमित्ताने पतंग उडविण्याचा आनंद घेत असतानाच रात्रीच्या वेळी येवला शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात येते.