भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे याच दरम्यान, भारताची स्टार महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तिनं तिच्या चाहत्यांना आश्चर्यचा धक्का दिलाय वेदानं कर्नाटकचा रणजी क्रिकेटपटू अर्जुन होयसलाशी साखरपुडा केल्याची इन्स्टाग्रामद्वारे माहिती दिलीय वेदानं पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अर्जुननं तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केलाय अर्जुनच्या प्रपोजला वेदा कृष्णमूर्ति हिनंही ग्रीन सिंग्नल दिला सध्या सोशल मीडियावर दोघांचे फोटो प्रचंड व्हायरल होत असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे महिला संघातील इतर खेळाडूंनीही वेदा कृष्णमूर्तीचं आयुष्याच्या नव्या टप्प्यासाठी अभिनंदन केलं. दोघांचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत वेदानं वयाच्या 18 व्या वर्षीत भारतीय संघात पदापर्ण केलं होतं तिनं भारतासाठी आतापर्यंत एकूण 48 एकदिवसीय आणि 76 टी-20 सामने खेळले आहेत.