पालघर जिल्ह्यातील निहे गावच्या तन्वी अरुण पाटील हिची अहमदाबाद येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला फुटबॉल संघात निवड झालीय.



महाराष्ट्र महिला फुटबॉल संघात निवड झालेली तन्वी पाटील ही पालघर जिल्ह्यातील पहिलीच महिला फुटबॉलपटू आहे.



पालघरच्या पूर्व भागात निहे या खेडेगावात जन्म झालेल्या तन्वीचे वडील अरुण पाटील हे कुटुंबासह सरावली येथे राहतात.



तन्वीचे वडील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत कामाला आहेत. तर, आई गृहीणी आहे.



तन्वीनं पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालय येथे शिक्षण घेतलंय.



कॉलेजमध्ये असताना एन.सी.सी.मध्ये सहभाग घेऊन 2018 साली दिल्ली मध्ये झालेल्या थलसेना शिबिरामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले होते.



आपले फुटबॉलमधील ध्येय गाठण्यासाठी तन्वीने अपार मेहनत घेतली असून रात्री फक्त 3-4 तासांची झोप मिळत असे.



तन्वीला देशाच्या विविध शहरात शिबिरे आणि स्पर्धेसाठी प्रवास करावा लागत असे.



फुटबॉलमध्ये भविष्य घडवण्यासाठी धडपड करणाऱ्या तन्वीला तिच्या आई-वडील, बहीण आणि प्रशिक्षकांचा भक्कम पाठींबा मिळाला.