आशिया चषक 2022 स्पर्धेत श्रीलंका संघ विजयी फायनलमध्ये पाकिस्तानला 23 धावांनी मात देत मिळवला विजय सर्वच खेळाडूंनी केली कमाल कामगिरी वानिंदू हसरंगाने अखेरच्या सामन्यात दाखवली चमक कर्णधार दासून शनाका याच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंकेनं मिळवला विजय विजयानंतर श्रीलंकेचे खेळाडू अगदी मैदानातच एकमेंकाना मिठी मारत होते. या विजयानंतर ट्रॉफीसोबत श्रीलंका संघाने दमदार असं सेलिब्रेशन केलं. श्रीलंकेनं यंदा ट्रॉफी जिंकत सहाव्यांदा आशिया चषक जिंकला आहे. यामुळे सर्वाधिक वेळा चषक मिळवणाऱ्यांच्या यादीत भारतानंतर श्रीलंका संघ दुसऱ्या स्थानी कायम आहे.