ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार आरोन फिंचनं अचानक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.



ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी होणारा तिसरा एकदिवसीय सामना फिंचच्या एकदिवसीय कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल.



फिंच दिर्घकाळापासून खराब फॉर्मचा सामना करत असताना त्याने हा निर्णय घेतला.



त्याच्या या निर्णयाने ऑस्ट्रेलिया क्रिकेटसह क्रिकेट जगताला धक्का बसला.



अनेकांनी फिंचला शुभेच्छा यावेळी दिल्या आहेत.



भारताचा माजी कर्णधार विराटनंही त्याला खास रिप्लाय दिला.



आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात आरोन फिंचनं अनेक सामने खेळले आहेत.



त्यामुळे विराटनं फिंचला खास ह्रदयस्पर्शी शुभेच्छा दिल्या.



तो म्हणाला वेल डन फिंच! एवढी वर्षे तुझ्याविरुद्ध आणि तुझ्यासोबत आरसीबीमध्ये खेळणं खूप छान वाटलं. तुझ्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्याचा पुरेपूर आनंद घ्या.



निवृत्तीची घोषणा केल्यानंतर फिंचनं इंस्टाग्रामवर क्रिकेट जगताचे आभार मानले.