खराब फॉर्ममुळे सातत्याने टीका होत असलेला सलामीवीर केएल राहुलचं पत्नी अथियासोबत देवदर्शन



तिसऱ्या कसोटीपूर्वी पत्नी अथिया शेट्टीसोबत केएल उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचला.



मंदिरात पोहोचून केएलनं बाबा महाकालचे दर्शन घेत पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली.



ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये केएल राहुलने खास कामगिरी केलेली नाही.



सध्या त्याचा अतिशय खराब फॉर्म पाहायला मिळत आहे.



त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याच्या प्लेईंग इलेव्हनमधील स्थानावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.



दरम्यान आता या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी केएल सराव करत असून पत्नी अथियासोबत देवदर्शनही करत आहे.



काही दिवसांपूर्वी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतल्यावर आता राहुल महाकालेश्वर मंदिरातही पोहोचला.



केएल राहुलने अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केलं.



त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते.