आज एक फेब्रुवारी रोजी देशात इंडियन कोस्ट गार्ड दिन साजरा केला जातोय.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी या दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

तटरक्षक दलाची कर्तव्ये काय आहेत हे जाणून घेऊयात. समुद्रावरील जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करणे.

किनाऱ्यापासून सागरी सीमेपर्यंत गस्त घालणे.

स्वकीय मच्छीमारांना संरक्षण देणे आणि परकीय मच्छीमारांचा अटकाव करणे. 

संशयास्पद जहाजे तपासणे तसेच दुर्घटनाग्रस्त जहाजांना मदत करून लोकांचे प्राण आणि संपत्तीचा बचाव करणे. 

किनाऱ्यावरील जहाजातून तेलगळती होत असल्यास समुद्रातील मासे आणि इतर जलचरांना वाचवणे. 

समुद्रात विमान दुर्घटना झाल्यास मदत करणे. 

प्रदूषणामुळे धोक्यात आलेल्या वनस्पतींचे संरक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखणे.

चोरट्या आयात-निर्यातीवर देखरेख ठेवून सीमाशुल्क आकारणे.  सागरी कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे आणि त्यावर गुन्हा दाखल करणे.