आपल्या देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC. यूपीएससी पास (UPSC Latest Update) होणं अनेकांचं ध्येय असतं.
अनेकजण दरवर्षी या परीक्षेची तयारी करतात मात्र काहींनाच यात यश मिळतं. यातील काहींच्या स्टोरी खूप प्रभावी आणि प्रेरणादायी असतात.
यातलंच एक नाव आहे दिल्लीच्या सर्जना यादव (IAS Sarjana Yadav )यांचं.
दिल्लीच्या सर्जना यादव यांची खासियत म्हणजे त्यांनी कुठल्याही कोचिंगशिवाय ही नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस (UPSC Exam) अधिकारी बनल्या.
त्या दिसायला जितक्या सुंदर आहेत तितक्याच प्रतिभावान देखील आहेत.
एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल असं त्यांचं सौंदर्य आहे.
दिल्लीच्या सर्जना यादव यांनी या UPSC परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लासेसचे तोंडही पाहिले नाही.
त्यांनी सेल्फ स्टडी करुन यश संपादित केलं.
आपला अभ्यास करणं आपल्या हातात असतं. जर आपल्याकडे अभ्यासासाठी पुरेसं साहित्य असेल आणि आपलं नियोजन परफेक्ट असेल तर आपल्याला यश मिळवण्यापासून कुणी रोखू शकणार नाही, असं सर्जना म्हणतात.