संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.
भ्रष्टाचार ही लोकशाहीला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरू आहे.
टॅक्स रिफंड मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असे. परंतु आता ITR भरल्यानंतर काही दिवसातच रिफंड मिळते
आयुष्मान भारत योजनेचा अनेकांना फायदा झाला आहे. या योजनेने 80,000 कोटी रुपये वाचवले आहे.
जन धन योजनेपासून ते वन नेशन वन रेशन कार्डपर्यंत बनावट लाभार्थी काढून टाकण्यापर्यंत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहे.
देशात 11 कोटी छोटे शेतकरी आहेत, त्यांना सशक्त आणि समृद्ध करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केले जात आहेत.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, मेक इन इंडिया मोहीम आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचा फायदा देशातील नागरिकांना मिळत आहे.
देशाच्या संरक्षण उत्पादनामध्ये सहा पटीने वाढ झाली आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत सैन्यात दाखल झाली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण 66 दिवसांचं असून ते दोन टप्प्यात चालणार आहे
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे!