वादळी बर्फवृष्टी दरम्यान सोमवारी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) समारोप झाला.

यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बर्फवृष्टी होत असताना कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे.

त्यांचं हे बर्फवृष्टी दरम्यान सुरु असलेलं भाषण पाहून अनेक नेटकऱ्यांना

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भर पावसात केलेल्या भाषणाची आठवण झाली

समारोप सभेत बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi म्हणाले की,

''येथे तैनात असलेल्या सीआरपीएफ, बीएसएफ आणि लष्कराच्या जवानांना सांगू इच्छितो की मला हिंसा काय असते हे समजतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि आरएसएसचे लोक हे समजू शकत नाहीत.

आम्ही इथे चार दिवस फिरलो. भाजपचा कोणताही नेता असा येथे चालणार नाही,

याची मी खात्री देतो. जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत म्हणून नाही, तर ते घाबरले आहेत.''