आज भारतीय हवाई दल (Indian Air Force) चा 91 वा स्थापना दिवस आहे.

या निमित्ताने आज वायू दलाला नवा ध्वज मिळाला आहे.

भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नवीन झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे.

72 वर्षांनंतर हा बदल करण्यात आला आहे.

हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल व्हीआर चौधरी यांनी परेड दरम्यान नवीन ध्वजाचं अनावरण केलं.

नवीन ध्वजावर उजव्या कोपर्‍यात भारतीय वायुसेनेचे चिन्ह असून

त्यामध्ये त्यात हिमालयन गरुड आणि अशोक स्तंभाची भर पडली आहे.

अशा नव्या रुपात आता

भारतीय वायू दलाचा नवा ध्वज दिमाखात फडकवण्यात आला.

8 ऑक्टोबर हा दिवस ‘भारतीय वायु सेना दिन’ म्हणून साजरा केला जातो.