जिंजीचा किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे.

Published by: जगदीश ढोले

ह्या किल्ल्याला राजगड आणि रायगडनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखतात.

दक्षिणेचा ट्रॉय म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला भारतातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक मानला जातो.

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना महाराजांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला.

पूर्वी असलेला किल्ला पाडून नव्याने महाराजांनी हा किल्ला बांधून घेतला.

शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला.

छत्रपती संभाजी महाराजांना फंदफितूरीने पकडून छळ करुन मारण्यात आले.

त्यावेळी स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले आणि तिथून राज्यकारभार पाहू लागले.

राजाराम महाराजांनी 8 वर्षे या गडावरुन राज्यकारभार पाहीला.यामुळे औरंगजेबाला आपले निम्मे सैन्य दक्षिणेकडे पाठवावे लागले.

परिणामी स्वराज्यावरील मुघल सैन्याचा दबाव कमी झाला व मराठ्यांनी गेलेले किल्ले व प्रदेश पुन्हा जिंकून घेतले.

मराठ्यांच्या इतिहासात दुर्गराज रायगडला जितकं महत्व आहे तितकंच महत्व जिंजीच्या किल्ल्याला सुध्दा आहे