IIM CAT 2024 परीक्षा, 24 नोव्हेंबर रोजी नियुक्त केंद्रांवर घेतली जाईल.
त्यामुळे परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचे ऍडमिट कार्ड उद्या म्हणजेच 5 नोव्हेंबर 2024 रोजी डाउनलोड करता येणार आहे.
अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर ऑनलाइन पद्धतींने उमेदवार ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात.
या परीक्षेद्वारे उमेदवारांना देशभरातील IIM संस्थांमधील पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेंट (PGP) आणि फेलोशिप प्रोग्राम इन मॅनेजमेंट (FPM)/(PHD) प्रोग्राममध्ये प्रवेश मिळू शकतो.
IIM CAT 2024 प्रश्नपत्रिका तीन विभागांमध्ये विभागली जाईल - वर्बल ऍबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रेहेन्सन (VARC), डेटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल रिझनिंग (DILR) आणि क्वांटिटेटिव्ह ऍबिलिटी (QA/Quants).
सर्व विभाग सोडवण्यासाठी 40 मिनिटे आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 120 मिनिटे दिली जातील.
IIM CTA परीक्षा देशभरातील एकूण 170 शहरांमध्ये घेतली जाईल.
या परीक्षेला बसण्यासाठी अर्ज प्रक्रिया 1 ऑगस्ट 2024 ते 20 सप्टेंबर 2024 या कालावधीत पूर्ण झाली.
परीक्षेशी संबंधित इतर तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.