भारत आणि झिम्बाब्वे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 13 धावांनी विजयी या विजयाह भारताने मालिका 3-0 च्या फरकाने खिशात घातली आहे. सामन्यात आधी फलंदाजीवेळी शुभमन गिलनं दमदार शतक ठोकलं. गोलंदाजीत अखेरच्या षटकात शार्दूल, आवेश जोडीने केलेल्या भेदक माऱ्यामुळे भारत जिंकला सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुलनं संयमी खेळी करत चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेट्ससाठी 79 चेंडूत 50 धावांची भागेदारी केली. राहुल-धवन बाद झाल्यानंतर गिल आणि ईशानने डाव सावरत 140 धावांची शतकी भागिदारी केली. 290 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात खास झाली नाही. पण सिन विल्यम्सने सिकंदर रझासोबत मिळून संघाचा डाव सावरला. सिन 45 धावा करुन बाद झाला खरा पण सिकंदर 49 व्या षटकात 115 धावा करुन बाद झाला. त्यानंतरही झिम्बाब्वे जिंकेल असं वाटत होतं, पण आवेशनं अखेरच्या षटकात उर्वरीत फलंदाजांना बाद करत भारताला विजयी करुन दिलं.