भारताने आधी उत्तम गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजीच्या जोरावर 10 विकेट्सने विजय मिळवला आहे.



या विजयासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.



झिम्बाब्वेच्या हेरारे स्पोर्ट्स क्लब येथे पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने विजयाची नोंद केली आहे.



सामन्यात सर्वप्रथम म्हणजे नाणेफेक जिंकत प्रथम भारताने गोलंदाजी घेतली.



दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णासह फिरकीपटू अक्षर पटेलच्या भेदक माऱ्यापुढं झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.



ज्यामुळं झिम्बाब्वेचा संघ 40.3 षटकात 189 धावांवर ऑलआऊट झाला.



190 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताकडून सलामीवीर शुभमन आणि शिखर या दोघांनी अगदी अप्रतिम सुरुवात केली.



शुभमनने 72 चेंडूत नाबाद 82 तर शिखरने 113 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या.



ज्यामुळे 30.5 षटकातच भारताने 192 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.



ज्यामुळे भारताने 10 गडी राखून विजय मिळवला या विजयामुळे भारत मालिकेत 1-0 च्या आघाडीवर पोहोचला आहे.