अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमदनं (Shahbaz Ahmed) झिम्बाब्वेविरुद्धच्या भारताच्या एकदिवसीय मालिकेत निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय.
रणजी ट्रॉफी आणि आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी त्यानं केलेल्या प्रभावी कामगिरीनंतर निवडकर्त्यांनी झिम्बाब्वे दौऱ्यात त्याची भारतीय संघात निवड केलीय.
या मालिकेला येत्या 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. महत्वाचं म्हणजे, भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर खांद्याच्या दुखापतीमुळं भारतीय संघातून बाहेर पडलाय.
ज्यामुळं शाहबाज अहमदला संघात स्थान देण्यात आलंय. भारताच्या एकदिवसीय संघात निवड झाल्यानंतर शाहबाज अहमदनं आपली प्रतिक्रिया दिलीय.
प्रत्येकाला भारताची जर्सी घालून देशासाठी क्रिकेट खेळण्याची इच्छा असते- शाहबाज अहमद
भारतीय संघानं मला संधी दिली आणि माझं साकार झालं- शाहबाज अहमद
बंगालच्या संघानं माझ्यावर विश्वास ठेवला. या संघातून खेळल्यानंतर माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला- शाहबाज अहमद
भारतासाठी खेळताना मी माझे शंभर टक्के देईल- शाहबाज अहमद