भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना भारतानं गमावला. न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे झालेल्या सामन्यात भारत 7 विकेट्सनी पराभूत झाला. सामन्यात न्यूझीलंडने जबरदस्त फलंदाजीचं दर्शन घडवत 307 धावांचं आव्हान केवळ 47.1 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केलं. मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेतही किवींनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आधी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने केला. ज्यानंतर भारताने सलामीवीर शिखर धवन-शुभमन गिल यांच्या अर्धशतकांसह श्रेयस अय्यरच्या 80 धावांच्या जोरावर 306 धावां केल्या. ज्या न्यूझीलंडने टॉम लेथमच्या नाबाद 145 आणि कर्णधार केनच्या नाबाद 94 धावांच्या जोरावर पूर्ण करत सामना जिंकला. आज भारताचे गोलंदाज पराभवाचं मोठं कारण ठरले, सर्वांनीच खराब गोलंदाजी केली. तुफान फटकेबाजी केलेल्या टॉमला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं आता मालिकेतील दुसरा सामना 27 नोव्हेबरला होणार आहे.