आयर्लंड दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आलं आहे. राहुल त्रिपाठीलाही अखेर भारतीय संघात एन्ट्री मिळाली आहे. यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक संघात आहे. संजू सॅमसन याचंही संघात पुनरागमन झालं आहे. दुखापतीतून सावरून सूर्यकुमार यादवही संघात परत युवा अष्टपैलू वेंकटेश अय्यरही संघात आहे. सलीमीवीर म्हणून ईशान किशन ऋतुसोबत असेल. सलामीवीर म्हणून ऋतुराज गायकवाड संघात आहे. फलंदाज दीपक हुडालाही संघात स्थान देण्यात आलं आहे. आयपीएल गाजवलेल्या अर्शदीपला या मालिकेसाठीही निवडलं आहे. युवा वेगवान गोलंदाज आवेश खानही संघात आहे. या मालिकेसाठी भुवनेश्वर कुमार उपकर्णधार असणार आहे. सध्याचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहलही संघात आहे. अष्टपैलू अक्षर पटेलही संघात असल्याचं कळत आहे. हर्षल पटेललाही संधी देण्यात आली आहे. युवा फिरकीपूट रवी बिश्नोईही संघात आहे. आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजीने सर्वांना हैराण करणारा उमरानही संघात आहे.