मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.



मंगळवारी (14 जून) वटपौर्णिमेच्या निमित्तानं हेमांगीनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.



पोस्टमध्ये हेमांगीनं तिचे खास फोटो शेअर केले. या फोटोला हेमांगीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.



हेमांगीनं तिचे काही फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'साता जन्माच्या गोष्टी! नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा त्याच्या नाकी नऊ न आणणं हे जास्त महत्वाचं आणि फलदायी व्रत आहे कुठल्याही बायकोसाठी!'



'वडाची फांदी तोडून घरी आणून पुजण्यापेक्षा किंवा वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा आपल्या नवऱ्याच्या नावाचं झाड प्रत्येक वर्षी लावलं तर फक्त त्याचंच नाही तर आपलं ही आयुष्य वाढेल कदाचित! काय?', असंही हेमांगीनं पोस्टमध्ये लिहिलं.



पुढे हेमांगीनं लिहिलं, 'यात कुणाच्या ही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीयेत. उपवास करायची ज्याची त्याची इच्छा आणि श्रद्धा!'



हेमांगी 'लेक माझी दुर्गा' या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली



'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



हेमांगी तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.



हेमांगीची चाहता वर्ग मोठा आहे.