बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतचा 'धाकड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. 85 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. पण या सिनेमाने फक्त 2.58 कोटींची कमाई केली आहे. 85 कोटींपेक्षा अधिक बजेटमध्ये 'धाकड'ची निर्मिती करण्यात आली आहे. पण बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने फक्त 2.58 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे निर्मात्यांचे 78 कोटींचे नुकसान झाले आहे. 'धाकड' हा एक अॅक्शन ड्रामा आहे. कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. 'धाकड' सिनेमा कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' या सिनेमामुळे बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. 'धर्मवीर' आणि 'सरसेनापती हंबीरराव' या मराठी सिनेमांनीदेखील धाकडपेक्षा अधिक कमाई केली आहे.