Jammu and Kashmir मध्ये या मोसमातील पहिलाच मोठा हिमवर्षाव होत आहे.

हिमवर्षावाने सर्वसामान्य जनजीवन स्तब्ध झालंय.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या दिवशीच हा हिमवर्षाव अनुभवायला मिळाला

जम्मू काश्मीरमध्ये या मोसमातील पहिल्याच हिमवर्षावाने सर्वसामान्य जनजीवन प्रभावित झालंय.

प्रशासनाने रस्त्यावर साचलेलं बर्फ हटवण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरु केलीय.

राज्यातील महत्वाचे महामार्ग रस्त्यावर साचलेल्या बर्फाने बंद पडलेत. यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

रस्तोरस्ती उभ्या असलेल्या गाड्यांवरही बर्फाचे थर जमा झाले आहेत.

प्रशासनाने बर्फ हटवलेल्या रस्त्यांवरुन अतिशय संथगतीने वाहतूक सुरू आहे.

मात्र महामार्गावरील वाहतूक अजून बंदच आहे.

जम्मू-काश्मीरमधील काही हायवेवर जागोजागी वाहने अडकून पडल्याची माहिती आहे.