आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन , देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर देशाच्या संस्कृती आणि सामर्थ्याचं दर्शन झालं.

आज सकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांना वंदन करून पंतप्रधान कर्तव्य पथावर दाखल झाले

तिथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं

आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.

आजच्या कार्यक्रमाला इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसि हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते

राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर झालेल्या शानदार सोहळ्यात

भारताच्या सामरिक शक्तीचं दर्शन संपूर्ण जगाला झालंय लष्कर, नौदल, वायूदल.

यासोबत निमलष्करीदल, पोलीस, डीआरडीओसारख्या संस्था

माध्यमातून भारताची ताकद आणि सांस्कृतिक वारसा उपस्थितांनी आणि संपूर्ण जगानं पाहिला.