देशात अलिकडे वाढत असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर एक चांगली दिलासादायक बातमी आहे देशात गेल्या दोन महिन्यांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 751 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे रविवारी 18 हजार 738 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती दुसरी चांगली बाब म्हणजे कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे सोमवारी दिवसभरात देशात 16 हून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे कोरोना रुग्णांची घटती संख्या ही मोठी दिलासादायक बातमी आहे सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे सध्या देशात 1 लाख 31 हजार 807 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत देशात आजपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 5 लाख 26 हजार 772 जणांचा मृत्यू झाला आहे