भारतीयांचे सोने, चांदी आणि दागिन्यांवर किती प्रेम आहे हे, संपूर्ण जगाला माहीत आहे. भारत सोन्याच्या सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक देश आहे. पण आता काळ बदलत आहे. आता भारतात हिरा, पन्ना आणि इतर रत्नांची मागणी वाढत आहे. भारतातील हिरे,रत्नांचे मुख्य व्यापार केंद्रे गुजरात आणि राजस्थानमध्ये आहेत. गुजरातमधील सुरत हे जगातील सर्वात मोठे हिरे बाजार केंद्र आहे. जगातील हिरे आणि दागिन्यांच्या एकूण निर्यातीत भारताचा वाटा 3.5 टक्के आहे. या बाबतीत भारताचा जगातील टॉप-7 निर्यातदारांमध्ये समावेश आहे. जर आपण फक्त हिऱ्यांबद्दल बोललो तर भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारत जगातील 29 टक्के हिऱ्यांची निर्यात करतो.