शिर्डी साई परिक्रमेस भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला

देश विदेशातील हजारो भाविक या पायी परिक्रमेत ‌सहभागी झाले

14 किलोमीटर असलेली ही परिक्रमा लक्षवेधी ठरली.



शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेले चित्ररथावरील देखावे

साईबाबा हयातीत असताना शिर्डी गावच्या शिवेची परिक्रमा करत होते, असा उल्लेख साईबाबांच्या‌ जीवनावर आधारीत साईसतचरित्र ग्रंथात आढळतो.

त्या धर्तीवर तीन वर्षापूर्वी ग्रीन अँड क्लिन शिर्डीच्या वतीने साई परिक्रमा उत्सव सुरू करण्यात आला.



मात्र कोविड संकटात ‌या उत्सवात खंड पडला होता.

सर्व नियम शिथील झाल्यानंतर आज निघालेल्या शिर्डी परिक्रमेत पाच हजारांहून अधिक भाविक सामिल झाले आहेत.

राज्य आणि विदेशातून आलेले भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.