‘व्हिक्टोरिया’ या मराठी हॉररपटामुळे सध्या अभिनेता विराजस कुलकर्णी प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातून तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.



याशिवाय अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबतच्या रिलेशनशिपमुळेही अभिनेता चर्चेत आहे.



‘सांग तू आहे का?’ या मालिकेत झळकलेली अभिनेत्री शिवानी रांगोळे, ‘सोनपरी’ अर्थात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मुलाला विराजसला डेट करत आहे.



शिवानी आणि विराजस यांनी एकत्र एका नाटकात काम केले होते. या नाटकादरम्यान त्यांच्यात प्रेम फुलले.



‘झी युवा’च्या ‘बनमस्का’ या मालिकेतून शिवानी रांगोळेला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती.



शिवानी रांगोळे ‘बनमस्का’, ‘सांग तू आहेस का?’, ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकांमध्ये झळकली आहे. (Photo : @rangshivani/IG)