देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत आहे गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 3 हजार 116 नवीन रुग्ण आढळले असून 47 जणांचा मृत्यू झाला आहे कोरोनावर मात केल्याने शनिवारी 5 हजार 559 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात देशात 5 हजार 559 लोक बरे झाले होते यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 38 हजार 69 इतकी झाली आहे कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 15 हजार 850 झाली आहे मिळालेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 37 हजार 72 लोक संसर्गमुक्त झाले आहेत देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 180 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत शनिवारी दिवसभरात 20 लाख 31 हजार 275 डोस देण्यात आले आतापर्यंत लसीचे 180 कोटी 13 लाख 23 हजार 547 डोस देण्यात आले आहेत