वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यातून आवेश खाननं टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. त्यानं 2014-15 च्या हंगामातून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. आवेश खान देशांतर्गत सामन्यांमध्ये मध्य प्रदेशकडून खेळलाय. भारताच्या अंडर-19 विश्वचषकातही त्याची निवड झाली होती. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आवेशला नेट गोलंदाजांमध्ये स्थान मिळालं होतं. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आवेश खान दिल्लीकडून खेळणार आहे. आवेशनं आयपीएलच्या 25 सामन्यात 29 विकेट घेतल्या आहेत. वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात आवेश कशी कामगिरी करतोय? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.