टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात आलेल्या डोमिनिका कसोटीच्या पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व

वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत सर्वात आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

विंडिजचा संघ अवघ्या 150 धावांवर ऑल आऊट झाला.

टीम इंडियासाठी हुकुमी एक्का ठरला रविचंद्रन अश्विन.

अश्विननं एक नाही, दोन नाही, तर तब्बल 5 विकेट्स घेत इंडिजच्या संघाचा धुव्वा उडवला.

रवींद्र जाडेजानं 14 ओव्हर्समध्ये 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजनंही प्रत्येकी एक-एक विकेट घेतला.

भारतानं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात एकही विकेट न गमावता 80 धावा केल्या.

रोहित आणि यशस्वीनं टीम इंडियासाठी 80 धावांची खेळी केली

वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 47 धावा एलिकनं केल्या. त्यानं 99 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि एक षटकार लगावला.