रिटायरमेंट होऊन तीन दशक झाल्यानंतरही सुनील गावस्कर करतात कोट्यवधींची कमाई. त्यांची एकूण संपत्ती जाणून घ्या...



भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांचा आज 74 वा वाढदिवस आहे.

भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांचा आज 74 वा वाढदिवस आहे.

सुनील गावस्कर यांचा जन्म 10 जुलै 1940 रोजी झाला. गावस्कर यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 13,214 धावा केल्या.



सुनील गावस्कर 74 वर्षांचे झाले आहेत. गावस्कर यांनी 1971 ते 1987 पर्यंत टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे.



गावसकर यांनी क्रिकेटला अलविदा करून अनेक वर्षे उलटली आहेत, पण तरीही त्यांची कमाई कोट्यवधींमध्ये आहे.



मीडिया रिपोर्टनुसार, सुनील गावस्कर यांची एकूण संपत्ती 250 कोटी रुपये आहे. पण, ही माहिती अधिकृत नाही.



मीडिया रिपोर्टनुसार, सुनील गावस्कर यांची मासिक कमाई दोन कोटींच्या जवळपास आहे. ते दरवर्षी सुमारे 25 कोटी कमावतात. गावस्कर यांची बहुतांश कमाई कॉमेंट्री आणि जाहिरातींमधून होते.



कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे सुनील गावसकर हे पहिला फलंदाज होते. गावस्कर यांनी कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात तीन शतके झळकावणारे पहिले फलंदाज ठरले होते.



आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गावस्कर यांनी 125 कसोटी आणि 108 एकदिवसीय सामने खेळले आहेत.



देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या सुनील गावस्कर यांनी एकूण 348 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.