मुनाफ पटेल याचा 12 जुलै रोजी वाढदिवस आहे. 2011 सालच्या भारतीय विश्वचषक विजेत्या संघाचा मुनाफ पटेल सदस्य होता. या विश्वचषकात मुनाफ पटेल याने 11 विकेट घेतल्या होत्या. मुनाफनं 13 कसोटी, 70 वन डे आणि तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 35, वन डेत 86 आणि ट्वेन्टी ट्वेन्टीत चार फलंदाजांना माघारी धाडलं. फिटनेसच्या कारणांमुळे मुनाफ आपलं संघातील आपल्या स्थानात सातत्य राखू शकला नाही. आयपीएलच्या पहिल्या सत्रात तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला आणि त्याने १४ बळी घेतले. 2018 मध्ये मुनाफने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली सध्या युवा गोलंदाज घडवण्याचे काम मुनाफ करत आहे.