चेन्नई सुपर किंग्स कर्णधार महेंद्र सिंह धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धोनीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये धोनीच्या साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. जगभरात असे अनेक खेळाडू आहेत जे लक्झरी लाईफस्टाईल जगतात पण, धोनी अत्यंत साधेपणाने जीवन जगतो. धोनी रविवारी इंडिगोच्या फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसला. धोनी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं. प्रवासा दरम्यान धोनी मोबाईल गेम खेळताना दिसला. धोनीच्या समोर एक टॅब ठेवला आहे, ज्यामध्ये तो गेम खेळताना दिसत आहे. यामध्ये धोनी कँडी क्रश खेळताना दिसत आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. कँडी क्रश हा 2014-2015 या वर्षातील सर्वात लोकप्रिय गेम होता. या काळात अनेक लोक बस, मेट्रो किंवा ट्रेन इत्यादींमध्ये कँडी क्रश खेळताना दिसत होते.