भारताचा कर्णधार रोहित शर्माकडं विश्वविक्रम मोडण्याची संधी उपलब्ध झालीय. टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या पहिल्या 10 खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा एकमेव भारतीय खेळाडू आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलच्या (164) नावावर आहे. या यादीत वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल (124) तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा फलंदाज इयॉन मॉर्गन 120 षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आरोन फिंच या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 120 षटकारांची नोंद आहे.