भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली कायम असतो चर्चेत कधी ऑनफिल्ड खेळामुळे तर कधी ऑफफिल्ड गोष्टींमुळे असतो चर्चेत जगभरात त्याचे करोडो चाहते आहेत. त्यामुळे त्याचे इन्स्टा फॉलोवर्सही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्याच्या इन्स्टा पोस्ट व्हायरल होत असतात. आतातर त्याने फॅमिलीसोबत एक खास फोटो शेअर केला आहे. विराटने अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबतचा एक छान फोटो शेअर केला आहे. फोटोला कोहलीने सुंदर कॅप्शन देखील दिलं आहे. विराटने पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबतचा शेअर केलेला फोटो एका समुद्रकिनारचा आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये किंग कोहलीने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद दिल्याबद्दल देवाचे आभार मानले आहेत.