भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडेत विराट कोहलीने शानदार शतक झळकावले.



त्याने 91 चेंडूत 113 धावांची दमदार खेळी केली.



त्याच्या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.



या शतकासह त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 73 वे शतक पूर्ण केले आहे.



याआधी त्याने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावले होते.



ज्यामुळे त्याने सलग दोन सामन्यात शतक झळकावत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत



विशेष म्हणजे वर्षाच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावत कोहली पुन्हा फॉर्मात परतल्याचं दाखवून दिलं आहे.



एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12, 500 धावांचा टप्पा पार करणारा कोहली हा दुसरा फलंदाज ठरला आहे.



याशिवाय त्याने वनडे कारकिर्दीतील 45 वे शतक त्याने झळकावले.



त्याचवेळी घरच्या मैदानावर त्याचे हे 20 वे आंतरराष्ट्रीय शतक होते.