कसोटी मालिकेत आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाचा वचवा भारताच्या अंडर 19 संघानं काढला आहे अंडर-19 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात टीम इंडिया अंडर 19 नं दक्षिण आफ्रिकेला 45 धावांनी पराभूत केलं आहे. या विजयाचे शिल्पकार राहिले कर्णधार यश धुल आणि गोलंदाज विक्की ओस्तवाल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. भारतीय संघानं 46.5 षटकांमध्ये सर्वबाद 232 धावा केल्या. 233 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा 45.4 षटकात 187 धावांवर गुंडाळला. भारताकडून विक्कीनं शानदार गोलंदाजी कर पाच विकेट्स घेतल्या. भारताकडून यशनं 82, रशिदनं 31, निशांत सिंधु 27, राज बावा 13 तर कौशल तांबेनं 35 धावा केल्या.