बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर काल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना खेळण्यात आला.



या मालिकेत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं उत्कृष्ट कामगिरी केली. ज्यामुळं त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलंय.



दरम्यान, सर्वाधिक वेळा मालिकावीराचा पुरस्कार जिंकणारा भुवनेश्वर कुमार पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरलाय.



जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामीच्या अनुपस्थितीत त्यानं संघाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली.



या मालिकेतील चार सामन्यात त्यानं सहा विकेट्स घेतले. या मालिकेतील चार सामन्यांमध्ये त्यानं 14.16 च्या सरासरीनं आणि 10.4 च्या स्ट्राईक रेटनं गोलंदाजी केली.



भुवनेश्वर कुमारनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्यांदा मालिकावीराचा पुरस्कार जिंकला.



टी-20 क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार जिंकणार भुवनेश्वर कुमार पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरलाय.



भुवनेश्वर कुमारनं अनेक सामन्यात भेदक गोलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.