श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.
श्रीलंका- ऑस्ट्रेलिया यांच्यात कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यात आला.
या सामन्यात निसांका आणि कुशल मेंडिसच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या संघानं ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव केला.
या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियानं जिंकून पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 आघाडी घेतली होती.
मात्र, त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेनं जोरदार कमबॅक केलं. या मालिकेत श्रीलंकेचा संघ 2-1 नं आघाडीवर आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. मात्र अव्वल आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या छोट्या खेळीनं ऑस्ट्रेलियाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.
कर्णधार आरोन फिंचनं 62 धावांची खेळी खेळली. तर ट्रॅव्हिस हेडनं 70 आणि यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीनं 49 धावा केल्या.
दरम्यान, ऑस्ट्रेलियानं 50 षटकात सहा विकेट्स गमावून श्रीलंकेसमोर 292 धावांचं लक्ष्य ठेवलं. श्रीलंकेकडून जेफ्री वँडरसेनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
निसांका- कुशल मेंडिस यांनी 170 धावांची भागीदारी करत श्रीलंकेच्या विजयाचा पाया रचला.
अखेर श्रीलंकेनं 4 विकेट्स गमावून आणि 9 चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठलं.