भारतात गेल्या काही आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाला वेग आला आहे
याबाबत एक दिलासादायक बातमी म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे
देशात मागील 24 तासांत 12 हजार 781 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे
आधीच्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत जरी घट झाली असली तरी कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे
रविवारी दिवसभरात 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे
गेल्या 24 तासांत 8 हजार 537 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे
भारतात रविवारी दिवसभरात 2 लाख 96 हजार 50 नमुन्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत देशात एकूण 85.81 कोटीहून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 1.86 टक्के इतकं झालं असून रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.84 टक्के इतका आहे
रविवारी राज्यात तब्बल 4004 रुग्ण आढळले असून सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत
रविवारी दिवसभरात मुंबईत 2087 रुग्णांची नोंद झाली आहे