भारताने दुसरा कसोटी सामना जिंकत मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. दुसऱ्या सामन्यात अय्यर-अश्विन जोडीने कमाल भागिदारी करत सामना जिंकवला. कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली भारताने मालिका जिंकत WTC पॉईंट टेबलमध्ये स्थानब बळकट केलं आहे. पहिला सामना भारताने 188 धावांच्या तगड्या फरकाने जिंकला. त्यानंतर आता दुसरा सामना 3 विकेट्सने जिंकला. सामन्यात दोन्ही डावात मिळून 6 विकेट्स आणि दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण नाबाद 42 धावा करणाऱ्या अश्विनला सामनावीर पुरस्कार दिला. तर मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या पुजाराला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. भारक WTC रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. आता भारत थेट फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी खेळेल. जानेवारीच्या सुरुवातीला भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादीत षटकांचे सामने होणार आहेत.