भारत वि. बांगलादेश यांच्यात सुरु मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने जिंकला. मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे सुरु आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशनं फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला 12 वर्षानंतर कसोटी संघात मिळालं स्थान भारतीय गोलंदाजांची पहिल्या दिवशी कमाल गोलंदाजी बांगलादेशच्या फलंदाजांना 227 धावांत सर्वबाद केलं. बांगलादेशचा संघ 73.5 षटकंच खेळू शकला. भारत आता फलंदाजी करत असून 19/0 अशा स्थितीत आहे. पहिल्या डावात यावेळी बांगलादेशसाछी मोमीनल हक याने 84 धावांची एकहाती झुंज दिली. भारताकडून उमेश आणि अश्विनने प्रत्येकी 4 तर उनाडकटने 1 विकेट घेतली.