11 सप्टेंबर 2001 ही तारीख अमेरिकेच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदली गेली आहे. या दिवशी अमेरिकेने इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्याचा सामना केला होता. या हल्ल्यात हजारो नागरिकांनी जीव गमवला होता. या हल्ल्यानंतर अमेरिकेने जगभरातील दहशतवाद संपवण्यासाठी लष्करी कारवाई सुरु केली.

ABP Majha
9/11 च्या हल्ल्याला आज 22 वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली होती.जगातील सर्वात सुरक्षित देश म्हणून अमेरिकेची ओळख आहे. पण दहशतवाद्यांनी अमेरिकन विमानांचं अपहरण केलं आणि न्यूयॉर्कच्या ट्विन टॉवर्समध्ये घुसवली त्यावेळी सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

हा दहशतवादी हल्ला अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील गेल्या 100 वर्षांतील सर्वात धोकादायक हल्ल्यांपैकी एक मानला जातो. 9/11 च्या हल्ल्याच्या दिवशी काय घडलं आणि दहशतवाद्यांनी त्यांची कारवाई कशी पार पाडली हे जाणून घेऊया.

अल कायदाच्या 19 दहशतवाद्यांनी अमेरिकेत चार विमानांचं अपहरण केलं. यानंतर त्यांनी क्षेपणास्त्रांसारख्या विमानांचा वापर केला आणि न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डीसीमधील दोन मोठ्या इमारतींना लक्ष्य केले.

सर्वप्रथम दहशतवाद्यांनी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सला लक्ष्य केलं. पहिले विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.46 वाजता नॉर्थ टॉवरला धडकले. त्यानंतर 17 मिनिटांनी, 9.03 वाजता, दुसऱ्या विमानाने दक्षिण टॉवरला धडक दिली

ABP Majha

दोन तासांनंतर, दोन्ही 110 मजली टॉवर इमारती जमीनदोस्त झाल्या. धूर आणि धुळीचे लोट उठले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला.

ABP Majha

यानंतर दहशतवाद्यांनी अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय पेंटागॉन देखील लक्ष्य केलं आहे. दहशतवाद्यांनी अपहरण केलेले तिसरे विमान पेंटागॉनच्या पश्चिम भागात सकाळी 9.37 वाजता कोसळले.

ABP Majha

त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर, चौथं विमान पेनसिल्व्हेनियातील एका शेतात सकाळी 10.03 वाजता कोसळले. या विमानातून दहशतवाद्यांना अमेरिकन संसदेला लक्ष्य करायचे होते, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

ABP Majha

अमेरिकेवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात एकूण 2977 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यात चार विमानांमध्ये एकूण 246 लोक आणि क्रू मेंबर्स होते. ट्विन टॉवरवरील हल्ल्यात 2606 लोकांचा मृत्यू झाला, तर पेंटागॉनवरील हल्ल्यात 125 लोकांचा मृत्यू झाला होता.

ABP Majha