महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतानं निराशाजनक कामगिरी केलीय.



भारतानं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. यातील दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे.



भारतानं आतापर्यंत पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या संघाचा पराभव केलाय.



न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला.



आता भारताचा पुढचा सामना 22 मार्चला बांगलादेशविरुद्ध होणार आहे.



त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी या स्पर्धेतील शेवटचा सामना खेळेल.



भारतीय संघानं आपले शेवटचे उरलेले दोन्ही सामने गमावले तर विश्वचषकातून बाहेर पडणे निश्चित आहे.



त्याचबरोबर भारताला दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित करता येईल.