ब्लॅकबेरीची (Blackberry) चव ही इतकी वेगळी आहे की कधी ती आंबट लागते तर कधी गोड लागते. कधी मिल्कशेकसह तर कधी आईस्क्रिमसह ब्लॅकबेरी लोकांना खायला आवडते. ब्लॅकबेरी हे व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज यांसारख्या खनिजे आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असलेले फळ आहे जे मानवी शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे मेंदूच्या चालनेला तर फायदा होतोच पण त्याचबरोबर याच्या सतत सेवनाने दातांनाही फायदा होतो. ब्लॅकबेरी खाल्ल्याने त्वचादेखील निरोगी आणि सुंदर चमकदार राहते. कारण ब्लॅकबेरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.